उस्मानाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त  सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबादच्या वतीने येत्या 14 एप्रिलपर्यंत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. 
    या सप्ताहानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर (सेंट्रल इमारत), उस्मानाबाद येथे शनिवार, दि. 11 एप्रिल, 2015 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या रक्तदान शिबीराचे लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त, एस. के.मिनगिरे यांनी केले आहे.                                         
 
Top