उस्मानाबाद -  ‍जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिकचे अधिपत्याखालील शासकीय दुध डेअरीसमोर  त्रेंबकेश्वर रोड, नाशिक येथे सर्व सोयीनिशी सुसज्य सैनिक (मुलांचे) वस्तीगृह एप्रिल,2015 पासून सुरु होणार आहे. या वसतीगृहात  प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. या वस्तीगृहात  जागा  शिल्लक असल्यास इतर नागरीकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
         तरी ज्या आजी/ माजी ‍सैनिकांचे /विधवांचे/नागरीकांचे पाल्य नाशिक येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असेल या वसतीगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक यांचेकडून प्रवेश पुस्तीका घ्यावी व अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह  सैनिकी (मुलांचे) वसतीगृह नाशिक येथे सादर करावेत.अधिक माहितीसाठी त्यांचा भ्रमणध्वनी कं. 9226773181 असा आहे. असे जिल्हा सैनिक  कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविलेआहे.           
 
Top