उस्मानाबाद - सन 2015-16 च्या खरीप हंगासाठी  तुती लागवड व रेशीम कोष उत्पादनाची योजनेअंतर्गत तुती लागवड करु इच्छिणा-या शेतक-यांनी विहीत नमुन्यात अर्ज 30 जुन,2015 पर्यत सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
          विहीत नमुना व इतर माहिती रेशीम संचालनालयाच्या वेबसाईट www.mahasilk.gov.in वर तसेच जिल्हा रेशीम कार्यालयाकडे उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सोबत रुपये 500 रोखीने नोंदणी फी जमा करुन शेतक-यांनी तुतीची लागवडबाबत  नोंदणी करावी. शेतक-यांकडे किमान 0.20 गुंठे क्षेत्र असावे, यास कमात मर्यादा नाही, सिंचनाची सोय असावी, अनुचित जाती/ जमाती शेतकरी, अल्प ,अत्यप, भुधारक शेतकरी  वरील प्रवर्गाचे पुरेसे शेतकरी  उपलब्ध  न झाल्यास इतर प्रवर्गातील सर्व शेतकरी पात्र राहतील.
एका लाभार्थ्यास किमान 0.20 हेक्टर ते 2 हेक्टर क्षेत्राचे लाभ देय असून शेतक-यांना शासनाच्या नियमानुसार 75 टक्के तुती झाडे जीवंत ठेवणे व किमान दोन पीक घेवून रेशीम कोष उपात्दन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. 
या दोन्ही बाबीची पूर्तता केल्यास राज्य शासनाच्या जिल्हा  वार्षिक योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, केंद्रीय रेशीम मंडळाच्या योनजेतून त्यांना तुती लागवड , ठिंबक सिंचन संच, किटक संगोपन गृह, साहीत्य, नर्सरी, गांडुळ खतनिर्मीती शेड निर्जंतुकीकरण औषधे तसेच रेशीम प्रशिक्षण आदीकरीता आर्थीक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तसेच मनरेगा अंतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील  लाभार्थ्यांना तुती लावगड अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येईल. तुतीची  लागवड करु इच्छिणा-या शेतक-यांनी विहीत नमुन्यात अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.                                         
 
Top