उस्‍मानाबाद (राहुल कोरे)  कोंड ता. उस्‍मानाबाद येथील ग्रामदैवत श्री. भीमाशंकर यात्रेनिमित्‍त गुरूवार दि. 2 एप्रिल रोजी  भव्‍य मिरवणुक मोठया उत्‍सहाने काढण्‍यात आली. 
       
उस्‍मानाबाद तालुक्‍यातील कोंड येथील श्री. भीमाशंकर यात्रेनिमित्‍त विविध कार्यक्रम पार पडले. येथील भीमाशंकरचे देवस्‍थान परिसरात प्रसिध्‍द असून या यात्रेत सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात. यात्रेनिमित्‍त अखंड हरिनाम सप्‍ताह, भगवत कथा, हरिपाठ, किर्तन, प्रवचन, काकडा आरती, आदी कार्यक्रम संपन्‍न होतात. बुधवार दि. 1 एप्रिल रोजी महाप्रसादाचे उपस्थित भाविकांना वाटप करण्‍यात आले.  यात संपूर्ण गावाला जेवण दिले जाते. गुरूवारी सकाळी श्री. भीमाशंकराची पहाटे पाच वाजता मंदिरातून भव्‍य मिरवणुक काढण्‍यात आली. या मिरवणुकीत तेर येथील वैराग्‍य महामेरू वारकरी दिंडी  सहभागी झाली होती. त्‍याचबरोबर महादेवाची काठी, कावड, महिला, भजनी मंडळ, लेझीम पथक मिरवणुकी सहभागी झाले होते. ''श्री'' ची मुर्ती रथामध्‍ये ठेवून मिरवणुक काढण्‍यात आली. ही मिरवणुक मंदिरापासून वेताळ चौक, चांभार गल्‍ली, शिवाजी चौक, बस स्‍थानक परिसरातून हणुमान मंदिर मार्गे परत मंदिरासमोर भारूडाच्‍या कार्यक्रमानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्‍यात आले.
   ही मिरवणुक शांततेत पार पाडण्‍यासाठी गावातील शहादत मुलांनी, अजमेर मुलाणी, बालाजी शिंदे, अनिल सरवदे, सुभाष कणकधर, कुमार परदेशी, रामराजे गायकवाड, दिलीप गायकवाड, पितांबर पाटील, अनुरथ भोसले, दत्‍ता जाधव, सागर शेंडगे, ग्‍यानदेव चव्‍हाण, राजाभाऊ पाटील, दत्‍ता शिवलकर, लिंबराज घोडके, रणधीर पाटील, जनार्धन गायकवाड, जनार्धन आदरकर, दत्‍ता कोरे, विठ्ठल मोरे, देवानंद घुटे, मधुअप्‍पा शेंडगे, बालाजी पाटील, कमलाकर कुलकर्णी, बाळासाहेब गुरव, विष्‍णु लोंढे, नंदकुमार लोंढे, विश्‍वास पाटील, तुकाराम लोंढे, शिवाजी पाटील आदी ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले. (छाया - राहुल कोरे) 

 
Top