उस्मानाबाद - तुळजाभवानी देवीची धाकटी बहिण म्हणून नावलौकीक असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रेच्या दुसऱ्या दिवशी  येडेश्वरीची पालखी चे आंबराईच्या दिशेने प्र
स्थान झाले. पालखीचे बाजारचौक व माणिकचौकात आगमनानंतर आई राजा उदो उदोचा एकच जयघोष करुन भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पालखी मिरवणूक  दरम्यान खासदार रविंद्र गायकवाड, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार दिलीप सोपल, पंचायत समितीच्या सभापती छाया वाघमारे, कळंबचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरिक्षक श्री.चिखलीकर, येरमाळयाचे सरपंच नरहरी कांबळे, येडेश्वरी मंदीर ट्रस्टचे श्री.बेद्रे यांच्यासह आबासाहेब बारकुल, रणजित बारकुल, टेकाळे, विकास बारकुल, ग्राम विस्तार अधिकारी श्री.बारकुल यांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले.  
           येरमाळा येथील येडेश्वरीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व गावकऱ्यांनी सहकार्य करुन मोलाचा वाटा उचलला होता. पालखी चुन्याच्या रानाच्या दिशने प्रस्थान झाल्यानंतर भाविक भक्तांनी पालखीवर पुष्प, नैवेद्य अदिंचा मोठा वर्षाव करीत आई राजा उदा उदोचा जयघोषही अखंड सुरुच ठेवून या भागातील वातावरण भक्तीमय केले होते. चुनखडीच्या रानात पालखीचे आगमन होताच चुनखडी वेचण्यासाठी आलेल्या 8 लाख भाविकांचा महासागर उसळला होता. त्यांनतर काही कालावधीतच विमानातून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत पालखीचे आंबराईमध्ये आगमन झाले. या पालखीचा आंबराईमध्ये मातेचा 5 दिवस वास्तव्य राहणार असून 9 एप्रिल रोजी मातेचे पुन्हा मुख्य मंदीराकडे प्रस्थान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी व मनोरंजनासाठी विविध प्रकारची दुकाने व स्टॉल लावण्यात आले आहेत. पुढील काळात दि.6 रोजी एप्रिल रोजी पशुप्रदर्शन, 7 रोजी दुपारी 4 ते रात्री 8-30 या वेळेत कुस्ती फड, सांस्कृतिक कार्यक्रम, आराधी गाणी व इतर कार्यक्रम  व 8 तारखेला  9 वाजता शोभेची दारुची अतिषबाजी तर 9 तारखेला 4 वाजता घुगरी महाप्रसाद व आंबराईतून पालखीचे मंदीराकडे प्रस्थान होऊन यात्रेची सांगता होणार आहे. 

 
Top