उस्मानाबाद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत कळंब तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            कळंब तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार व्हि. एन. पाटील, सदस्य पंचायत समितीचे सभापती छाया वाघमारे, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य बालाजी आडसुळ, गटविकास अधिकारी व्ही. आर. देशमुख, सहायक सरकारी वकील सौ.अॅड एस. जी. इनामदार, तालुक्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख सी. एल. सावळे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेखचे एल. ए. झुंजार, नगर भुमापण अधिकारी  यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शहाजी चव्हाण, संजय घुले, विश्वनाथ तोडकर, पत्रकार यांचे प्रतिनिधी  मंगेश यादव व सतिश टोणगे तर मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे अॅड सी. बी. बिक्कड, पनेलवरील एक वकील ॲड. बी. बी. कोळपे यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.

 
Top