बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) मातृभूमी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येणार्‍या शुध्द पेय जल प्रकल्प कौतुकास्पद आहे. दूषित पाणी बहुतांश आजाराचे मूळ असल्याने सामाजिक संघटनांनी शुध्द पाणी उपलब्धतेला दिलेले प्राधान्य महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. मनोज लोखंडे यांनी केले.
मातृभूमी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लबच्या वतीने आगळगाव, खामगाव, घारी व इर्लेच्या पाठोपाठ शिराळे (ता.) येथे शुक्रवारी दि.३ रोजी जि.प. शाळेच्या आवारात शुध्द पेय जल (आरओ प्लँन्ट), जिल्हा परिषद शाळेस विविध खेळणी, अंगणवाडी विद्यार्थ्यांना आरोग्य कार्ड आदी उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यापारी राजाभाऊ बाबर, विनय संघवी, संतोष पाटील, नायब तहसीलदार उत्तम पवार, कॅन्सरतज्ञ डॉ. मनोज लोखंडे, डॉ. मधुकर फरताडे, संतोष ठोंबरे, प्रताप जगदाळे, गौतक कांकरिया, पद्माकर चवरे, सयाजी गायकवाड, अजित कुंकुलोळ, मधुकर डोईफोडे, संजय देशपांडे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.  राज्यात विविध गावांतील दूषित पाण्यामुळे आजार होण्याचे प्रमाण पाहिल्यास शुध्द पाणी योजना राबविण्याची संकल्पना सुचली व त्यातूनच ती प्रत्यक्षात येत आहे. या शुध्द पाणी प्रकल्पाचा गावातील जास्तीत जास्त कुटुंबानी लाभ घ्यावा आणि स्वत:चे आरोग्य सांभाळावे. प्रतिष्ठाणने पाच गावात प्रकल्प सुरु केले असले तरी भविष्यात प्रत्येक गावात स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करु. या प्रकल्पांबरोबरच पाणी अडवा - पाणी जिरवा, पर्यावरण, तसेच शेतकर्‍यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांनी म्हटले.
ज्यांना सामजिक कार्याची आवड व भान आहे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मातृभुमी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून एकत्र येऊन सुरु केलेले काम आदर्शवत आहे. गावकर्‍यांनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करुन घ्यावा, तसेच आपआपसातील मतभेद विसरुन एकोप्याने रहावे तसेच गावांमध्य जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरणाचे संगोपन करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंदु चंदनशिवे, समाधान, लक्ष्मण, अनिल, बालाजी, बापू, किरण, दिपक व हनुमंत चौधरी, दत्ता सुरवसे, ग्रामसेविका जी. एन खेडकर यांनी परिश्रम घेतले.

 
Top