उस्मानाबाद - जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्री. काळभैरवनाथ  सोनारी यात्रा, हजरत खॉजा शमशोदीन गाझी उरुस शांततेच्या वातावरणात पार पाडता यावे, यासाठी  तसेच दहशतवादी कारवायाच्या अनुषंगाने अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी  प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 31 मे च्या मध्यरात्रीपर्यत जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केले आहेत.
              जिल्ह्यात भाडयाने राहणारे व अनधिकृत खाजगी अथवा शासकीय जागेत परराज्यातील नागरीक, परदेशी नागरीकांनी त्यांचे ओळखपत्रासह व ते राहत असलेल्या घरमालकांचे सहमतीपत्र व निवासाचे पत्ते, सी आर पी सी कलम 144 आदेश जारी झाल्याच्या दिनांकापासून भाडे तत्वावरील घर, दुय्यम प्रतीचे मोटार वाहन विक्री / खरेदी, वादग्रस्त सीडी / गाणे, सायबर कॅफेचा वापर, स्फोटाचा साठा, बोगस सिमकार्ड वापर, मागील तीन महिन्यात विक्री केलेल्या सिमकार्ड धारकांची माहिती, जुने वाहन भंगारमध्ये खरेदी/ विक्री करणे आदिची माहिती संबधित पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. दहशतवादी कारवाया करणारे व्यक्ती खोटया नावाने भाडयाने खाजगी जागा/ भाडे तत्वावरील घर/ लॉज येथे राहून दहशतवादी कारवाया करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किरायाणे राहणाऱ्या अशा व्यक्तीची नोंद त्यांचे ओळखपत्र व निवासाच्या पत्यासह संबधित पोलीस स्टेशनला  सादर करणे बंधनकारक आहे.  दुय्यम प्रतीचे मोटार वाहन विक्री/ खरेदी करणारे लोकांकडून अनाधिकृतपणे व्यवहार झाल्यास अशी वाहने स्फोटात वापरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला किरायाणाने / भाडयाने ठेवताना घरमालक/ लॉज मालक/ धर्मादाय संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक/ मालकांनी वास्तव्यास राहणारे व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्याची माहिती संबधित पोलीस स्टेशनला न देता भाडयाने/ किरायाने ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दुय्यम प्रतीचे मोटार वाहन विक्री/ खरेदीची माहिती संबधित पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. तसेच आक्षेपार्ह वादग्रस्त सीडी /गाणे वाजविल्यामुळे जातीय-धार्मीक तेढ होण्याची  शक्यता आहे. अवैध बोगस सिमकार्ड वापर करण्यास व अवैध स्फोटक साठा बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे. 
           मागील तीन महिन्यात विक्री केलेल्या सिमकार्ड धारकांची माहिती  सादर करणे आवश्यक आहे. सायबर कॅफे मालकांस आपली ओळख पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली  आहे. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी,असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

 
Top