बार्शी - तालुक्यातील मुंगशी परिसरात सलग दोन दिवस झालेल्या वादळीवार्‍यांसह अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून त्यांच्याकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष केल्याने अनेक शेतकरी शून्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीसाठी तहसिल, महसूल आदी कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करावे, त्यानुसार शासनाकडून मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत परंतु तहसिलच्या सर्कल अधिकारी आणि तलाठी कामगार
यांच्यातील मतभेद, तहसिलदारांचे इतरत्र दौरे यामुळे
तिसर्‍या दिसशीही आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांकडे कोण
ताही शासकिय अधिकारी फिरकला नाही.
गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्‍या वादळी वा-यांसह झालेल्‍या अवकाळी पावसात अनेकांच्‍या
घरांवरील तसेच जनावरांच्‍या गोठयावरील पत्रे उडून गले, आंबा, चिंच, लिंब, बाभळ आदी प्रकारचे मोठे वृक्ष उन्‍मळुन पडले. सगळीकडे पाणीच पाणी झाल्‍याने शेतक-यांना शेतामकध्‍ये पाय टाकणेही मुश्किल झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल पल्‍याने विद्युत पुरवठा बंद झाला. अनेक शेतक-यांनी शेतातील ज्‍वारीची कणसे काढून मळणीसाठी जमा केलेली शेकडो टन ज्‍वारी पावसाने भिजल्‍याने काळी झाली आहे. द्राक्ष बागाच्‍या अँगलसह खाली कोसळल्‍याने नुकसान झाले आहे.
 
Top