पांगरी (गणेश गोडसे)  कारी (ता.बार्शी) परिसरात वनखात्याच्या रानडुकरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून ही रानडुकरे शेतकर्‍यांच्या  जिवावर उठू लागली आहेत.अनेक शेतकर्‍यांच्या अंगावर या डुकराणी हल्ला केला असून एका शेतकर्‍याचे तर नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे.
          बिरबल गोरोबा काळे वय 30 रा.कारी हा शेतकरी कारी साठवण तलावाशेजारील आपल्या शेतात भर दुपारी पिकास पानी देत असताना अचानक 15 ते 20 रानडुकरांच्या कळपाणे त्यांना हेरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.हाताला,मांडीला,बरगडीला आदि शरीराच्या विविध भागावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.शेजारी कोणीही इतर शेतकरी नसल्यामुळे काळे हे जिवाच्या आकांताने लढत होते.अखेर रानडुकरांचा राग शांत झाल्यावर त्यांनी तेथून काढता पाय घेतला.जखमी काळे यांना उपचारासाठी बार्शीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  शेतकर्‍यावर भर दिवसा हल्ला झाल्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे.वनखाते येवढे होऊनही फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे.आधीच दुष्काळ त्यात अवकाळीमुळे रखडलेली शेतीची कामे व भरीस भर म्हणून रानडुकराणी घातलेला धुमाकुळ यामुळे कारी परिसरातील जनता त्रस्त  झाली आहे.बार्शी तालुक्यात वनखात्याचे मोठे क्षेत्र असून उन्हाळ्यात प्राण्यासाठी पानवठे तयार करणे गरजेचे आहे.मात्र वनाखाते याकडे सोयिस्कर कानाडोळा करत असल्याचे समजते.वन्य प्राण्यास जंगलातच पानी उपलब्ध झाल्यास प्राणी जंगलाबाहेर पडून शेतकरयुयांच्या होणार्‍या उभ्या पिकाचे नुकसांन टळणार आहे॰त्यामुळे आर्थिक हानी टळण्यासही मदत होणार आहे.तरी वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी याकडे लक्ष केंद्रित करून पाण्याची पूर्तता करावी.
      पाण्याच्या शोधात मरण पदरात: जंगलात वन खात्यातर्फे पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे जंगली प्राणी वनाबाहेर पडून राज्यमार्गावरील वाहनांना धडकुन बळी पडत आहेत.काही दिवसापूर्वी पाण्यासाठी बाहेर पडलेल्या काळवीटाचा वाहनाच्या धडकेत मृतू झाल्याची घटना ताजीच आहे.पाण्यासाठी बाहेर पडलेले अनेक प्राणी रस्त्यावर मृत आवस्थेत निद्रार्शनास येतात.बार्शी तालुक्याच्या पूर्व भागात वन खात्याचे खूप मोठे क्षेत्र आहे. 
   प्राणिमित्रांनी हात पुढे करावे: 
मुक्या प्राण्यावर दया करा,त्यांना जिवदान द्या,त्यांना जगू द्या,निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साखळीची गरज असते असे गळा काढून ओरडणारे प्राणिमित्र सध्या भूमिगत झाल्यासारखी स्थिति निर्माण झाली आहे.वन खाते प्राण्यासाठी कमी पडत असेल तर हे प्राणी जगावण्यासाठी प्राण्यासाठी काम करणार्‍या विविध संघटनाच्या कार्यक्रत्यांनी प्राण्यांना मदतीचा हात पुढे करत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.मात्र एवढी भीषण स्थिति समोर येऊनही कोणी पुढाकार घेत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 कारी परिसरातील वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडू लागले असून वनखात्याने त्याच्यासाठी पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.जंगलातील पाण्याचे स्तोत्र संपल्यामुळे प्राणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे.

 
Top