नळदुर्ग - येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्‍या झालेल्‍या अत्‍यंत चुरशीच्‍या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून या पॅनलला  नऊ जागा मिळाल्‍या. तर सोसायटी बचाव पॅनलचा दारूण पराभव झाला असला तरी केवळ चारच जागेवर उमेदवार विजयी झाले आहेत.या निवडणुकीच्‍या रिंगणात दोन्‍ही पॅनलचे मिळून 21 उमेदवार रिंगणात होते. तर दोन उमेदवार बिनविरोध काढण्‍यात आले. सोसायटीच्‍या निवडणुकीत अनेक दिग्‍गजांना दारूण पराभव पत्‍करावा लागला. एकंदरीत शेतकरी विकास पॅनलने सोसायटीवर आपले वर्चस्‍व कायम ठेवण्‍यात यश मिळविले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्‍या समर्थकांनी गुलालाची मुक्‍त उधळण करत फटाक्‍याची जोरदार अतिषबाजी केली.   
       
नळदुर्ग विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीसाठी रविवार दि. 5 एप्रिल रोजी मतदान होवून लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्‍यात आला. या निवडणुकीत कॉंग्रेस - राष्‍ट्रवादी - भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढीप्रमाणे आहे. चव्‍हाण सुधाकर निवृत्‍ती (सर्वसाधारण मतदार संघ - 358 मते), हजारे सुरेशसिंग शिवासिंग (सर्वसाधारण  - 352 मते), मिटकर शिवाजी लक्ष्‍मण (सर्वसाधारण - 364), मोटे सुरेश देवीदासराव (सर्वसाधारण - 357 ), नाईक मुकुंद श्रीपतराव (सर्वसाधारण - 353 ), पाटील शाहुराज भाऊराव (सर्वसाधारण - 371 मते), सिरगुरे सिध्‍दव्‍वाबाई महादेव (महिला राखीव - 382),बनसोडे दयानंद आप्‍पाराव (अनू जाती जमाती -बिनविरोध), डुकरे कमलाकर नारायण ( भटक्‍या विमुक्‍त जाती - बिनविरोध)  
 सोसायटी बचाव पॅनलचे 11 पैकी 4 उमेदवार विजयी झालेले पूढीप्रमाणे बताले संजय आण्‍णाप्‍पा (सर्वसाधारण - 355), पाटील सुहास सुर्यकांत (सर्वसाधारण - 354), पाटील विजयाबाई राजकुमार (महिला राखीव - 380), माने रामचंद्र लक्ष्‍मण (इतर मागास - 370) इत्‍यादी. 
पराभुत झालेले उमेदवार
सोसायटी बचाव पॅनलचे  उदय आंबादास जगदाळे (347 मत), कमलाकर निवृत्‍ती चव्‍हाण (339), अमृत सुरेश पुदाले (332), जुल्‍फेकारअली जाफरअली सय्यद (337), एकबाल बाबासाब कुरेशी (325), दिनेश अंजनीकुमार बाळूरकर (345), श्रीमती प्रमिला धनूसिंग ठाकूर (363) तर शेतकरी विकास पॅनलचे जागिरदार नशीर रफिक (338) , कोरे सुभाष शिध्‍दणप्‍पा (298), कुरेशी मंजूर शेरअहमद (353), इत्‍यादी उमेदवार पराभुत झाले आहे. सोसायटी बचाव पॅनलचे राष्‍ट्रवादी कॉंग्रेचे अशोक जगदाळे शेतकरी विकास पॅनलचे कॉंग्रेस पक्षाचे सुधीर जगदाळे,  शहबाज काझी, राष्‍ट्रवादीचे नय्यर जागिरदार, भाजपचे पद्माकर घोडके यांनी निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी प्रयत्‍न केले. 

 
Top