उस्मानाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल,2015 या कालावधीत करण्यात येणार आहे.  येथील जिल्हा परिषद कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10 वाजता या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयाचे प्रा.एम.आर.कांबळे, दलितमित्र शंकर खुने वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.     

 
Top