उस्‍मानाबाद  - यावर्षीचा दुष्‍काळ हा गेल्‍या वर्षीच्‍या दुष्‍काळपेक्षा तीव्र असल्‍याचे सांगून गतवर्षी दुष्‍काळग्रस्‍त व गारपीटग्रस्‍त शेतक-यांना कॉंग्रेस सरकारने कुठलाही भेदभाव न करता अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यावर जमा केले होते. पशुधन जगवण्‍यासाठी मागेल त्‍या गावाला चारा छावण्‍या सुरु केल्‍या होत्‍या. सध्‍याचे भाजपा चे सरकार घोषणाबाजी करुन वेळ काढूपणा करत असल्‍
याचे आरोप आमदार मधुकरराव चव्‍हाण यांनी टाकळी ता. उस्‍मानाबाद येथे बोलताना केले.  
  आ.मधुकरराव चव्‍हाण यांनी टाकळी ग्रामस्‍थांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी दुष्‍काळी परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी ज‍ि. प. अध्‍यक्ष धीरज पाटील,जि. प. उपाध्‍यक्ष सुधाकर गुंड, तालुका अध्‍यक्ष लक्ष्‍मण सरडे, पं.स.सदस्‍य दत्‍ता सोनटक्‍के, अल्‍पसंख्‍यांक सेलचे उपाध्‍यक्ष मेहराज शेख आदि उपस्थित होते.
    यावेळी शेतकरी संकटात सापडला असुन पशुधन जगवणे जिकीरीचे झाले आहे असे शेतक-यांनी सांगितले, तसेच गावातील विविध विकास कामांचे निवेदन सरपंच व्‍यंकट पवार यांनी आमदार चव्‍हाण यांना दिले.यावेळी बोलताना आमदार मधुकरराव चव्‍हाण म्‍हणाले की,  ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुर यांच्‍या प्रश्‍नांची जाण नसणारे शासन केंद्रात व राज्‍यात बसले आहे. त्‍यामुळे जनतेला कसल्‍याही प्रकारची मदत मिळत नाही. सरकारने पशुधन जगवण्‍यासाठी चारा छावण्‍या सुरु कराव्‍यात किंवा दावणीला चारा उपलब्‍ध करुन द्यावा असे सांगितले.यावेळी यावेळी सरपंच व्‍यंकट पवार उपसरपंच रब्‍बानी शेख, मागासवर्गीय सेल जिल्‍हा उपाध्‍यक्ष लक्ष्‍मण पाटोळे, कॉं तालुका सरचिटणीस आदम शेख, ग्रा.प. सदस्‍य मनोहर चौरे, चंद्रहास शिक्रे, त्रिंबक सोनटक्‍के, काकासाहेब गायकवाड, महादेव सुर्यवंशी, जमीर पठाण, सुभाष मोरे, लतिफ शेख, बलभिम कुंभार, बाबाराव सोनटक्‍के, तात्‍याराव सोनटक्‍के, पिरसाब शेख, बाळासाहेब खटके, मोहन सोनटक्‍के, दिपक सोनटक्‍के, व्‍यंकट लोखंडे, सुरेश सोनटक्‍के आदी उपस्थित होते.  (छाया - इस्‍माईल सय्यद)

 
Top