उस्मानाबाद - लोकशाही दिनात आज सोमवारी झालेल्या बैठकीत महसूल, पुनर्वसन, सहकारी संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका या शासकीय विभागातील एकूण 20 अर्ज प्राप्त झाल्या. तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची तक्रार समजावून घेत संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  दिले. 
          येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी  प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निला, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी लोकशाही दिनात सहभागी नागरिकांच्या तक्रारी  ऐकून घेतल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सदर तक्रार ज्या विभागाशी निगडीत आहे, त्या विभागप्रमुखांना ती देऊन संबंधित काम पाहणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन प्रलंबित तक्रारी तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. लोकशाही दिनाच्या अर्जात जे अर्जदार आत्मदहन, आत्महत्या व उपोषण सारख्या कृत्यांचा लेखी वापर केलेल्या अर्जदारांची मनोपचार तज्ञांकडून वैद्यकीय तपासणी  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी करुन अहवाल सादर करण्याची निर्देशही त्यांनी दिले.  जे कार्यालय प्रमुख लोकशाही दिनास उपस्थित राहणार नाहीत, त्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. 
          जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, शेतकरी अपघात विमा योजना, अनुसूचित जाती जमाती आयोग, भारत सरकार यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठकाही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी घेण्यात आल्या. 
         या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सरकारी वकील विजयकुमार शिंदे, समाजकल्याण आयुक्त एस.के.मिनगिरे, आर.बी.गवळी यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे दक्षता बैठकीत आढावा घेतांना म्हणाले की,  नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयातंर्गत 1 एप्रिल,2014 ते 31 मार्च,2015 या कालावधीत एकूण 54 विविध प्रकारच्या गुन्हांची  नोंद झाली आहे. 13 गुन्हे पोलीस तपासावरील गुन्हे, 12 पोलीस फायनल/कलम कमी, 29 कोर्टात दाखल गुन्हांची संख्या आहे. मागील गुन्हयांतील 37 प्रकरणांतील लाभार्थ्यांना एकूण 12 लाख रुपयाचे अर्थसहाय्य ही वाटप करण्यात आल्याचे सांगितले. या कायद्यातंर्गत वारंवार तेच तेच गुन्हे नोंद हात असल्याने संख्या वाढत जात असते. त्यामुळे प्रकरणातील गार्भीय लक्षात घेऊन प्रकरणे तातडीने समोपचाराने निकाली काढावीत,अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. 
           अनुसूचीत जाती-जमाती आयोगांचा संभाव्य दौरा लक्षात घेऊन विभागप्रमुखांची चर्चा करुन सर्व प्रकरणे निकाली काढावीत. त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणाकरी योजनांची माहिती, आरक्षणाबाबत आढावा घेणे, स्वयंरोजगार मेळावे, नविन्यपूर्ण उपक्रमांची अद्यावत करणे आदि विषयांबाबत सविस्तर चर्चा करुन  निर्देशही डॉ.नारनवरे यांनी दिले. 
               या लोकशाही दिनास विविध विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती. 

 
Top