उस्मानाबाद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत उमरगा तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            उमरगा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार उत्तमराव सबनिस, सदस्य पंचायत समितीचे सभापती अक्षरताई सोनवणे, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य कैलास शिदे, गट विकास अधिकारी बी. बी. खंडागळे, सहायक सरकारी वकील अॅड.बी. एस. होळीकट्टे, तालुक्यातील  पोलीस ठाण्याचे प्रमुख एस. बी. निकाळजे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेखचे श्रीमती एम. के. काटकर, नगर भुमापण अधिकारी  श्रीमती एम. के. काटकर, यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सौ. कालिंदी पाटील,  प्रो. किरण सगर, विजयकुमार वाघमारे, पत्रकार यांचे प्रतिनिधी अविनाश काळे, प्रा. गुणवंत जाधवर  तर मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे पॅनेलवरील एक वकील अॅड पी. एन. पनुरे यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.   

 
Top