पांगरी (गणेश गोडसे) शेतीसाठी उन्हाळ्यात लागणार्‍या पाण्याचे पावसाळ्यातच योग्य नियोजन केल्यास उन्हाळाही शेतकर्‍यांसाठी आल्हाद दायक ठरून पिके टिकुन शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवू शकतात.शासनाच्या शेततळी  योजनेतून पांगरी मंडलसह बार्शी तालुक्यामध्ये करण्यात आलेल्या शेततळ्यातून कोट्यावधी लीटर पाण्याचा साठा करण्यात आल्यामुळे दुष्काळातही शे
ततळी ही शेतकर्‍यांना वरदान ठरू पहात आहेत.
     शासनाने वेगवेगळ्या आकाराच्या शेततळ्यांसाठी अनुदान ठरवण्यात आले.दोन हजार घन मीटर पाणीसाठयाच्या शेततळ्यासाठी शासनाच्या रास्ट्रीय फलोत्पादन योजनेतून 1 लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.अनुदान मिळत असल्यामुळे बहुतांस शेतकर्‍यांणी शासनाच्या या योजनेकडे गांभीर्याने बघून शेततळयांच्या योजनेचा लाभ घेतला आहे.सलग चार वर्षापासून दुष्काळाचे चटके सोसणार्‍या बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांचे हरित क्रांतीच्या दिशेने पाऊल पडणार आहे.  जिरायतदार बनणार बागायतदार: अनेक वर्षापासून आपल्या शेतात फक्त ज्वारीचे,बाजारी,हुलगा,मटकी,तूर,हरभरा आदि पावसाशिवाय येणारी पिके घेणारा कोरडवाहु शेतकरीही आता बागायतदार म्हणून पुढे येणार आहे.शेततळ्यात साठा केलेल्या पाण्यावर भर उन्हाळ्यातही हे शेतकरी आपली द्राक्ष बागा जोपासून वांगी,टोमॅटो,घेवडा,गवार,कांदा आदि पाण्याची पिके घेऊन पैसे मिळवू शकणार आहेत.शेततळ्यात साठवण्यात आलेल्या पाण्याचा ठिबक सिंचन संचाच्या माध्यमातून वापर करून अल्प पाण्यावर नगदी पिके घेऊ घेण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले आहेत.त्यामुळे उन्हाळ्यातही शेतकर्‍यांच्या खिश्यात पैसा खळखळणार आहे.  बार्शी तालुका हा तसा पावसाच्या पडणार्‍या पाण्यावर अवलंबून असणारा तालुका आहे.तालुक्याचा कांही भाग सोडला तर बर्‍याच भागात शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य आहे.त्यामुळे शंभर एकराचा धनी आज दुसर्‍याच्या बांधावर कामासाठी भटकू लागला आहे.  शेत तळ्याचा आम्हाला उन्हाळ्यात पिकासाठी खूप लाभ होत असल्याचे रामलिंग सुरवसे,लक्षमन बनसोडे,सतीश जाधव विजय गरड,संतोष नाईकवाडी आदि शेतकर्‍यांनी सांगितले. चौकट: पाच एकर क्षेत्रापैकी कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांनी शेत तळ्यासाठी तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्रीधर जोशी बोलताना सांगितले.

 
Top