उस्‍मानाबाद -  भारतीय जनता पार्टीच्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त आज उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात विविध कार्यक्रम करण्‍यात आले. जिल्‍ह्यातील विविध मंडळात सदस्‍य नोंदणी अभियान राबविण्‍यात आले. उस्‍मानाबात शहरात भाजपाचे जेष्‍ठ कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक रमन आप्‍पा धोत्रीकर व वाशीचे जेष्‍ठ कार्यकर्ते विजय तळेकर यासह जेष्‍ठ कार्यकर्त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे,
संघटन मंत्री अविनाश कोळी, अॅड अनिल काळे, सतीश देशमुख, दत्‍ता कुलकर्णी, विजय शिंगाडे, भिमाण्‍णा जाधव, प्रविण पाठक, विनायक कुलकर्णी, तानाजी बापू उंबरे, बंटी मंजुळे, सुशांत भुमकर, अविनाश हावळे पाटील, पवन वाघमोडे, सुहास जोशी, आण्‍णासाहेब चौधरी, प्रविण सिरसाटे, शरद सिरसाटे आदी उपस्थित होते. (छाया - अजिंक्‍य माने)

 
Top