उस्मानाबाद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            उस्मानाबाद तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार सुभाष काकडे, सदस्य-पंचायत समितीचे सभापती प्रेमलता लोखंडे, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, गट विकास अधिकारी, सहायक सरकारी वकील अॅड व्ही. एस. कुलकर्णी, तालुक्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख डी. एम. शेख, तालुका निरीक्षक भुमि अभिलेख, नगर-भुमापन अधिकारी जी. व्ही. ढोबळे यांचा सदस्यात समावेश करण्यात आला आहे.   तर स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी सौ. प्रितम गांधी, सौ. सगुणा आचार्च, सौ. शीला विकास मगर, पत्रकारांचे  प्रतिनिधी व्ही. एम. सोनटक्के, महेश पोतदार , मोफत कायदेविषयक सल्ला समिती पॅनेलवरील एक वकील ॲड ओ. ए. मोरवे यांचा या समितीमध्ये सदस्य म्हूणन नेमणूक करण्यात आली आहे.  
 
Top