बार्शी -  तालुक्यातील महागाव येथील नदीपात्रातील पाण्यात आंघोळीस गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर नागरिकांनी बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे त्याला उपचारासाठी दाखल केले, परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगीतले.
शशिकांत जैन भोसले (वय २४, रा.खजगी ता.उमरगा, जि.धाराशिव) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ७ च्या अगोदर सदरची घटना घडली. बार्शी पोलिसांनी अकस्कात मृत्यूची नोंद करुन पांगरी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.

 
Top