उस्मानाबाद  - मनोधर्य योजनेतील पिडीतांना आधार देण्यासाठी व योग्य दिशेने तपास होऊन न्याय मिळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मनोधर्य योजनेंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅड. विजयकुमार शिंदे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी  वैभव सुर्यवंशी, श्री. कोळगे यांच्यासह संबंधित विभागाचे तपास अधिकारी यांची उपस्थित होती. 
              या बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, पडीतांना मनोधर्य योजनेतून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी 2 लाख रुपयांची आर्थीक मदत केली जाते. पडीतांवर झालेला दूर करण्यासाठी व तपास अधिकाऱ्यांना काही कायदेशीर  व विशेष मदत हावी असल्यास ती त्यांना उपलब्ध करुन दिली जाईल. अनुसूचित जाती-जमाती  प्रतिबंधक कायदयातील, राजकीय गुन्हयाबाबत गृह विभागाच्या सूचनानुसार तपासणी अंमलदार यांना उचीत कायदेशीर मार्गदर्शन होऊन सुसंवाद घडावा यासाठी या बैठकांचे आयोजन केले जाते.  महिला व बालकल्याण अधिकारी यांनी समन्वयक, अनुसूचित जाती-जमाती  प्रतिबंधक कायद्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, राजकीय गुन्हे संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांनी तर नोडल ॲफिसर म्हणून सरकारी वकील यांनी  काम पहाण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. यावेळी विविध प्रकरणांवर सविस्तर चर्चा करुन संबंधितांना योग्य ते निर्देश दिले.                    

 
Top