उस्मानाबाद -  बहिरवाडी , ता. जि. बीड येथील रहीवासी असलेले गोरखनाथ बाबुराव साळुंखे हा इसम 4 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास  तुळजापूरात श्रीतुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना त्यांची चुकामुक झाली. गावातील लोकांनी त्यांचा शोध घेतला. पण ते आढळून आले नाही.  साळुंखे वयोवृध्‍द 60 वर्षाचे आहेत. अंगाने सडपातळ,उंची- 6 फुट, रंग- गोरा, अंगात त्यांनी  पांढरा पायजमा, टोपी,
अंगात पोटऱ्या रांगाचा, तीन रंगाचा शर्ट, अशा वर्णनाचा इसम तुळजापूरातून हरवला आहे. या इसमाबाबत कोणास कांही माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन, तुळजापूर, जि. उस्मानाबादशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    

 
Top