उस्‍मानाबाद (इस्‍माईल सय्यद)   भाजप प्रणित सरकारला ग्रामीण जनतेच्‍या व शेतक-यांच्‍या व्‍यथा समजली नाही. केवळ स्‍मार्ट सिटी (सुंदर शहरे) बनवण्‍याकडे जास्‍त कल असल्‍यामुळे ग्रामीण जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. अधिवेशनात कॉंग्रेस पक्षाच्‍या आमदारांनी शेतक-यांना सरसकट अनुदान द्यावे, रब्‍बी/खरीप असा भेदभाव करून नये, शेतकरी अडचणीत आले, कर्ज माफी, विज बील माफी द्यावी, शेतकरी वि
रोधी भुसंपादन कायदा रद्द करावा अशा अनेक मागण्‍या लावून धरल्‍या आहेत. परंतू सभाग्रहात एकही शेतकरी हिताचा निर्णय शासनाने घेतला नसल्‍याचे आमदार मधुकरराव चव्‍हाण यांनी पाटोदा ता.तुळजापूर येथे बोलताना सांगितले .
        तालुक्‍यातील दुष्‍काळी परिस्थितीचा आढावा घेवून ग्रामस्‍थांशी संवाद साधून दुष्‍काळाची तीव्रता , त्‍यावर उपाय योजना करण्‍यासाठी आ. मधुकरराव चव्‍हाण यांनी पाटोदा गावास भेट दिली. त्‍यावेळी गावातील बोअरमधुन नळाद्वारे येणारी धार व पाण्‍यासाठी लागलेली 200 ते 300 घागरीचा रांग उन्‍हामध्‍ये पाण्‍यासाठी  स्त्रिया व लहान मुले भटंकती करीत असल्‍याचे दृश्‍य दिसुन आले. पाण्‍याची भीषण टंचाई पाहुन त्‍वरीत उपाययोजना करण्‍याबाबत सहाय्यक गटविकास अधिकारी गुप्‍ता व जिल्‍हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्‍याशी मोबाईलवरून संवाद साधला व त्‍वरीत टँकर सुरू करण्‍याचे सुचना दिल्‍या. 
        यावेळी जि.प. अध्‍यक्ष अॅड धीरज पाटील, उपाध्‍यक्ष सुधाकर गुंड, तालुकाध्‍यक्ष लक्ष्‍मण सरडे, ज्ञानदेव राजगुरू, भुजंग चव्‍हाण, महादेव असबे, चंद्र्कांत डावकरे, शैलेष पाटील, हणुमंत माळी, नानासाहेब ढोले, सरपंच रामा माळी, रामकृष्‍ण गवळी, विष्‍णु ढोले, बबलू मोरे, स्‍वप्‍नील पवार, आनंत मोरे, महादेव आंधारे आदीसह   ग्रामस्‍थ उपस्थित होते. सध्‍या चार बोअर अधिग्रहण केले असून तीन वर्षापासून पाऊस कमी झाल्‍यामुळे बोअरला पाणी कमी झाले आहे. बोअर अधिग्रहण केले असले तरी नळाच्‍या पाण्‍यापेक्षाही लहान धार चालू असल्‍यामुळे घागर भरण्‍यासाठी बराच वेळ लागतो. त्‍यामुळे सध्‍या ग्रामस्‍थांना एकच काम आहे ते म्‍हणजे पाण्‍यासाठी भटकंती करणे व पाणी मिळवणे. या सर्व बाबीचा विचार करून आमदार मधुकरराव चव्‍हाण यांनी टँकर मंजूरीबाबत जिल्‍हाधिकारी व बीडीओ यांच्‍याशी चर्चा करून ग्रामपंचायतीने त्‍वरीत प्रस्‍ताव सादर करावा. अशा सुचना दिल्‍या. यामुळे ग्रामसथांना पाणी मिळण्‍याची अशा उंचावली आहे. यावेळी खंडोबा मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम आमदार फंडातून पूर्ण केले असल्‍यामुळे सभामंडपाचा लोकार्पण साहळा  आ. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.    यावेळी जि.प. अध्‍यक्ष अॅड धीरज पाटील, उपाध्‍यक्ष यांचेही भाषण झाले. जिल्‍हा परिषद आपल्‍या दारी आली आहे. आपली विकासात्‍मक कामे जि.प.च्‍या माध्‍यमातून मार्गी लावू अशी ग्‍वाही दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानदेव राजगुरू तर आभार चंद्रकांत डावकरे यांनी मानले. (छाया - इस्‍माईल सय्यद)

 
Top