उस्मानाबाद -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत जिल्हा सल्लागार व अंमलबजावणी समिती, जिल्हास्तरीय कार्यकारी समिती व तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी कळविले आहे.
उस्मानाबाद जिल्हा सल्लागार व अंमलबजावणी समितीचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे अध्यक्ष असणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार हे सदस्य असणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विभागीय समाजकल्याण अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, प्रकल्प संचालक, आदिवासी विभाग, जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हे सदस्य आहेत. याशिवाय  सुधीर किसनराव कदम, आदम कचिर शेख, ॲड. रविंद्र अजिनाथ गुळवे, हे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून तर प्रवीण बापूराव पाटील, मनोज कालिदास घोगरे, पंचशीला मधुकर सावंत, श्रीराम बापू सूर्यवंशी हे सामाजीक क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती म्हणून सदस्यपदी घेण्यात आल्या आहेत. समितीच्या सदस्य सचिवपदी जिल्हा पोलीस अधीक्षक असतील.
याशिवाय, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव राहतील. याशिवाय या समितीत, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, प्रकल्प संचालक, आदिवासी विभाग, जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य राहतील.

 
Top