उस्मानाबाद :- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया प्रमाणात साजरी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. शहरात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनामुळे अडथळा निर्माण होणार आहे.शिवाय गैरसोय होवून अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 चे पोट कलम (1) (ब) अन्वये  प्राप्त अधिकारान्वये उस्मानाबाद शहरात खालील अवजड वाहनास प्रतिबंध करण्याचे आदेश जारी केले आहेत. 
उस्मानाबाद शहरात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिल 2015 च्या सकाळी 7 वाजेपर्यत खालील मार्गावरुन खाली नमुद वाहनाच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनाना वाहतूकीस बंदी  करण्यात आले आहे.
प्रवेश बंद केलेले मार्ग-शिवाजी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जाणारी वाहतूक शिवाजी पुतळा येथे बंद करण्यात आले आहे. वाहनासाठी पर्यायी मार्ग असे- तुळजापूरकडून बीडकडे व बीडकडुन तुळजापूरकडे जाणारी सर्व अवजड वाहने एन एल -211 बायपास रोडने जातील. तुळजापूरकडून उस्मानाबाद शहरात येणारी वाहने  व शिवाजी चौकातून आंबेडकर चौकाकडे जाणारी वाहने सरळ पुढे जावून कोर्टकॉर्नर, कोहीनुर हॉटेलकडे जाणारे रोड व सेंट्रल इमारत चौकातून मार्गस्थ होतील.
गणेश विसर्जन विहीर महात्मा फुले चौक ते आंबेडकर पुतळा जाणारी वाहतूक महात्मा  फुले चौक येथे बंद करण्यात येत आले आहेत. वाहनासाठी पर्यायी मार्ग-एस. टी. स्टॅडकडून शिवाजी चौकाकडे जाणारी वाहने सरळ पुढे जावून ताजमहल टॉकीज जवळील रोडने शहरात जातील.
पोलीस स्टेशन उस्मानाबाद, शहर लेडीज क्लबकडून डॉ.आंबेडकर पुतळयाकडे जाणारी वाहने गाडगे महाराज चौक येथे बंद करण्यात आले आहे. वाहनासाठी पर्यायी मार्ग-एस. टी. स्टॅडकडून बार्शीकडे जाणारे एस. टी. बसेस शिवाजी  चौकातून फीरुन सेंट्रल इमारत चौक मार्ग बार्शीकडे जातील. बार्शी नाका येथून येणारे अवजड वाहने एस. टी. बसेस बार्शी नाका येथून सेंट्रल इमारत चौकातून बसस्थानकाकडे मार्गस्थ होतील. 
बंदी आदेश लागू नसलेले वाहने-सर्व पोलीसांची वाहने, केंद्र व राज्याचे सरकारी वाहने,अग्निशामक व रुग्णवाहीकेला हे आदेश लागू राहणार नाही,याची सबधितानी नोंद घ्यावी, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

 
Top