उस्‍मानाबाद -  शहर व परिसरात गेल्‍या काही दिवसांपासून वर्गणी मागणा-या लोकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून व्‍यापाराकडून वर्गणीच्‍या नावाखाली मोठया रक्‍कमा सक्‍तीने व दडपशाहीने मागण्‍यात येत आहे. त्‍यामुळे शहरातील व्‍यापारी त्रस्‍त व भयभीत झाले असून याप्रकरणी पोलिस प्रशा
सनाने संबंधितावर कारवाई करून व्‍यापा-यांना पोलिस संरक्षण देण्‍याची मागणी जिल्‍हा व्‍यापारी संघाच्‍यावतीने पोलिस अधिक्षक यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.
      निवेदनात नमूद केले आहे की, व्‍यापारी आगोदरच गेल्‍या तीन वर्षापासूनच्‍या दुष्‍काळी परिस्थितीमुळे व्‍यवसायीकदृष्‍टया अर्थिक अडचणीत आहे. वर्गणी गोळा करत असताना काही ठिकाणी गुंडशाही केली जात आहे. या सर्व परिस्थितीवर जिल्‍हा पोलिस प्रशासनाने व्‍यापा-यांना संरक्षण द्यावे व त्‍यांच्‍या मालमत्‍तेचे  नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्‍यावी अन्‍यथा, व्‍यापा-यांना  नाविलाजाने धरणे आंदोलन व बेमुदत बंद पुकारावा लागेल याची प्रशासनाने नोंद घ्‍यावी. असा इशारा  उस्‍मानाबाद जिल्‍हा व्‍यापारी महासंघाच्‍यावतीने जिल्‍हा पोलिस अधिक्षक यांच्‍याकडे लेखी निवेदनाद्वारे देण्‍यात आला आहे. या निवेदनावर जिल्‍हा व्‍यापारी महासंघाचे अध्‍यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्‍मीकांत जाधव यांच्‍यासह  20 व्‍यापा-यांच्‍या सह्या आहेत. 

 
Top