नळदुर्ग - ओबीसी बौध्‍द धम्‍माच्‍या वाटेवर या अभियानाचे प्रनेते तथा सत्‍यशोधक ओबीसी परिषदेचे संस्‍थापक अध्‍यक्ष दिवंगत हणूमंत  काका उपरे यांना वागदरी ता. तुळजापूर येथील बौध्‍द बांधवांच्‍यावतीने सामुदायिकरित्‍या श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. 
      वागदरी येथे दर गुरूवारी बौध्‍द उपासक उपस्थितांच्‍यावतीने भिमनगर येथील समाज मंदिरात सामुदायिक रित्‍या बुध्‍द वंदनेच्‍या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गुरूवार दि. 26 मार्च रोजी येथे आयोजित सामुदायिक बुध्‍द वंदनेच्‍या कार्यक्रमात फुले - शाहु - आंबेडकर चळवळीतील विचारवंत तथा बौध्‍द धम्‍माचे प्रचारक हणूमंत काका उपरे यांच्‍या  निधनाबद्दल त्‍यांना भावपूर्ण श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. यावेळी रिपाइंचे तालुका अध्‍यक्ष एस.के. गायकवाड, रमाई महिला बचत गटाचया अध्‍यक्षा उज्‍वला वाघमारे, गिता झेंडारे, ग्रा.प. सदस्‍या कविता गायकवाड  आदीजण उपस्थित होते.   

 
Top