उस्‍मानाबाद - मुंबई दादर येथील 'वसंत स्‍मृती' या भाजपाच्‍या कार्यालयात महाराष्‍ट्रातील भाजपा सदस्‍य नोंदणी आढावा व आगामी कार्यक्रमाच्‍या बैठकीत उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात भारतीय जनता पार्टीने 1 लाख 11 हजार पेक्षा जास्‍त सदस्‍य नोंदवून अपेक्षित लक्ष्‍य पुर्ती केल्‍याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष खा. रावसाहेब दाणवे, राष्‍ट्रीय सहसंघटन मंत्री व्‍ही. सतिश, प्रदेश सरचिटणीस तथा नोंदणी प्रमुख सुजितसिंह ठाकूर, प्रदेश संघटन मंत्री प्रा. रविंद्र भुसारी, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे व त्‍यांचे सहकारी अॅड अनिल काळे, सतिश देशमुख, सत्‍यवान सुरवसे यांचे पुष्‍पगुच्‍छ देवून अभिनंदन केले.
खा. रावसाहेब दाणवे यांनी सांगितले की, उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी नसताना कार्यकर्त्‍यांनी चिकाटीने भाजपाची सदस्‍य नोंदणीच्‍या कार्यक्रमात 1 लाख 11 हजार सदस्‍य भाजपाची एवढी मोठी सदस्‍य संख्‍या नोंदविली आहे. या सदस्‍य नोंदणीच्‍या कार्यक्रमात एक महिन्‍याची मुदत वाढविण्‍यात आली आहे. पूढील काळात महाराष्‍ट्राचे लक्ष्‍य सव्‍वा कोटी सदस्‍याचे आहे. ते निश्चित पूर्ण होईल अशी आपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी सदस्‍य नोंदणीचा आढावा घेतला. (छाया - राहुल कोरे)  

 
Top