उस्मानाबाद-: जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक/विधवा व अवलंबीतांना दर वर्षी माहे नोंव्हेंबरमध्ये हयात असल्याबाबत प्रमाणपत्र बँकांना सादर न केल्यास बँकाद्वारे पेन्शन बंद केली जाते. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना बऱ्याच अडचणी येतात. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आदेशानुसार, जीवन प्रमाण कार्ड तयार करण्यास माजी सैनिक/विधवांना सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद यांच्याद्वारे खालील ठिकाणी व दिलेल्या तारखेस विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 
         विशेष अभियानाचे केंद्र व ठिकाण पुढीलप्रमाणे 16 मे 2015 ते 25 मे,2015 कालावधीत सकाळी 10 ते 6 या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद. 
           16 मे 19 मे,2015 तुळजापूर, 20 ते 25 मे उमरगा, 24 ते 25 मे कळंबआणि 26 मे ते 27 मे,2015 नळदूर्ग.  वरील तालुक्यातील केंद्र माजी सैनिक संघटना कार्यालयात आहेत. त्यांच्या वेळा सकाळी 10 ते सायंकाळी 4 अशा राहतील.  
            तरी जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक/विधवा/अवलंबीतानी त्यांचे आधार कार्ड, निवृत्ती वेतन बँक पासबूक, पी.पी.ओ व माजी सैनिक ओळखपत्राच्या छायांकित प्रतिसह जवळच्या विशेष अभियानाच्या ठिकाणी नमूद तारखेस हजर राहून जीवन प्रमाण कार्ड तयार करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष, तालुका माजी सैनिक संघटना यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन मेजर (नि), सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.                                 
 
Top