नळदुर्ग : वैष्‍णोदेवी फुड प्रोडक्‍टस प्रा. ली बाभळगाव ता. तुळजापूर या प्रकल्‍पाच्‍या आठव्‍या वर्धापन दिनानिमित्‍त रविवार दि. 30 ऑगस्‍ट रोजी सकाळी 10 ते सांयकाळी 5 या कालावधीत कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मधुकरराव चव्‍हाण , जिल्‍हाधिकारी डॉ. प्रशात नारनवरे , पोलिस आधिक्षक अभिषेक त्रिमुखे, यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दुग्‍ध उत्‍पादक शेतक-याचा गैरव, रक्‍तदान शिबीर , वृक्षारोपण , गुणवंत कामगाराचा गौरव , परिसरातील शाळेना ई लर्निगसाठी संगणक संच वाटपाचा कार्यक्रम , आदि भरगच्‍च कार्यक्रम होणार आहेत. 
             बाभळगाव ता. तुळजापूर या ओसाड माळरानावर गेल्‍या दशकापुर्वी वैष्‍णोदेवी या नावाने डेअरी सुरू केली. सुरूवातीस अनेक अडचणी आल्‍या. त्‍यावर मात करीत वैष्‍णोदेवी हा प्रकल्‍प आज भरारी घेवुन मोठया दिमाखात उभा आहे. येथे शासनाच्‍या नियामानुसार दुधावर प्रक्रिया करून दुग्‍धजन्‍य पदार्थासह दुध पावडर निर्मिती केली जाते. येथिल उत्‍पादित होणा-या दुग्‍धजन्‍य दर्जेदार पदार्थाची दखल घेवुन शासनाने या प्रकल्‍पास आय.एस.ओ. मानाकंन प्रमाणपत्र बहाल केले आहे. 
             या प्रकल्‍पात सध्‍या जवळपास चारशे स्‍थानिक लोकांना रोजगार उपलब्‍ध करून दिले आहे. उस्‍मानाबाद, बीड, लातुर तसेच सोलापूर जिल्‍हयातील शेतक-यांचे थेट दुध संकलन करण्यासाठी विविध ठिकाणी दुध शितकरण प्रकल्‍प उभे केले आहेत. या कंपनीने पंचेवीस हजारापेक्ष आधिक शेतक-यांना दुग्‍ध व्‍यावसायाशी जोडले आहे. नुसते व्‍यवसाय न करता सामाजिक बांधिलकी म्‍हणुन वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमाबरोबर राष्‍ट्रीय कार्यक्रम साजरा केला जातो. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन वैष्‍णोदेवी या प्रकल्‍पाचा आठवा वर्धापन दिन येत्‍या रविवार रोजी विविध कार्यक्रमाने साजरा होत असल्‍याची माहिती कंपनीचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक समीर काकाणी यानी बोलताना सांगतिले .
 
Top