पांगरी (गणेश गोडसे)  :- चिंचोली (ता. बार्शी) येथील सूरज नानासाहेब शिंदे यांची जलसंपदा विभागात उप-विभागीय अभियंता म्हणून निवड झाली आहे.महाराष्ट्र शाशनातर्फे 2013 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.चिंचोली सारख्या छोट्या खेड्यातून जलसंपदा विभागात व तीही उपविभागीय अभियंता म्हणून नौकरी मिळवणारे ते एकमेव आहेत.त्यांनी दोन वर्षाच्या काळात लोकसेवा आयोगाची तिसरी परीक्षा उतीर्ण झाले आहेत.
 सूरज शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोसुब (ता.संगमेश्वर) येथे तर उच्च शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले.श्री.शिंदे यांनी यापूर्वी एक वर्ष कोल्हापूर येथे विक्रीकर अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.सध्या ते  महाराष्ट्र जिवण प्राधिकरण विभाग औरंगाबाद येथे सहाय्य्क अभियंता म्हणून काम पाहत आहेत.त्यांचे वडील नानासाहेब शिंदे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व आई शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
  सूरज शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग चे पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे,डॉ.सुधीर शिंदे,कमलाकर पाटील,संतोष शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
 
Top