सकाळच्या हेडलाईन्स - ४ ऑक्टोबर २०१५ 
~~~~~~~~~~~~~~
 🌈🌈          
             - सोलापूर- उजनीत येणारा विसर्ग पुन्हा वाढला, ६ धरणे १00 टक्के भरली ,पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू : दौंडमधून ४७६४ तर बंडगार्डनमधून २५५१ क्युसेक्स विसर्ग, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७0 मिमी पाऊस झाला आहे.  

🌈🌈
            - अक्कलकोट : शहर व तालुक्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले असून, शहरात तीन तर ग्रामीण भागात पाच असे एकूण आठ डेंग्यूसदृश रूग्ण आढळून आले आहेत.  
या साथीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

🌈🌈   
           - सोलापूर : व्हॉट्सअँपवर आलेल्या तक्रारीची महापालिकेला दखल घ्यावी लागली. अतिक्रमण विरोधी पथकाने नवीपेठेतील सात टपर्‍या शनिवारी काढून टाकल्या. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी शहरातील बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी नागरिकांसाठी व्हॉट्सअँप सेवा सुरू केली आहे. 

🌈🌈
             - सोलापूर : संत नामदेवरायांच्या काव्यकार्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी दि. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर येथे तनपुरे मठात तीन दिवस संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

🌈🌈         
            - सोलापूर: हस्त नक्षत्राचा पाऊस जिल्ह्याच्या काही भागात सुरू झाल्याने रब्बी पेरणीसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. किमान पेरणीतरी होईल व चार्‍याचा प्रश्न मार्गी लागेल असा शेतकर्‍यांचा सूर आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.  

🌈🌈
            - मंगळवेढा : भरधाव वेगाने चाललेला टेम्पो मेंढय़ांच्या कळपात घुसल्याने सतरा मेंढय़ा चिरडल्या गेल्या हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर मेंढय़ांच्या मांसाचा खच आणि सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला दिसत होता.ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मंगळवेढा-चडचण रस्त्यावरील मेहरबाब आश्रमाजवळ घडली.

🌈🌈
            - सोलापूर : अज्ञात कारणावरून विडी घरकूल येथे बर्फ फोडण्याच्या टोच्याने केलेल्या मारहाणीत श्रीनिवास नागेंद्र गंटा (वय २७, रा. विडी घरकूल कुंभारी रोड) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार दुपारी ३ वा. घडला. 

🌈🌈
             - मुंबईतील चेंबूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.   

🌈🌈
             - नाशिक शहरात येत्या ८ ऑक्टोबरपासून २० ते ३० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. 

🌈🌈
             - दादरी येथील बीफ हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारने २० लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. 

🌈🌈
             - डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांचीही हजेरी. 

🌈🌈
             - डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषदेला सुरुवात, अभिनेता सचिन खेडेकर भाजपाच्या मंचावर, मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे वरिष्ठ मंत्री परिषदेला उपस्थित. 

🌈🌈 
             - एक्सप्रेस वेवरील टोलचे कंत्राट २०१९ पर्यंत असला तरी २०१७ मध्ये टोलवसुली पूर्ण होणार असल्याने २०१७ मध्ये टोल वसुली बंद करा - वेलणकर यांची मागणी

🌈🌈
             - भारतीय संघ आणि द. आफ्रिकेचा संघ भुवनेश्वरमध्ये दाखल झाला असून येत्या ५ ऑक्टोबरला दुसरा टी-२० सामना कट्टकमध्ये होणार आहे. 

----------------------
✏ वृतसंकलन-भाऊ वलेकर
~~~~~~~~~~~~~~
 
Top