पांगरी (गणेश गोडसे) :- पांढरी (ता.बार्शी) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब नवनाथ घावटे यांची तर व्हाईस चेअरमन पदी लहू शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी सेवा सोसायटीचे सचिव विष्णु गेंड यांच्यासह नूतन सदस्य व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
  पांढरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली होती.निवडणूक बिनविरोध होऊन बारा सदस्य निवडण्यात आले होते.पांढरी येथील सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन निवडीसाठी नुकतीच विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.चेअरमन पदासाठी बाळासाहेब घावटे व व्हाईस चेअरमन पदासाठी लहू शिंदे यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.निवडीप्रसंगी नूतन संचालक बळीराम घावटे,भानूदास घावटे,अरुण पाटील,कल्याण घावटे,भारत गव्हाने,हरीदास घावटे,शाम शिकेतोड,कुंडलिक बडेकर,सुमन घावटे,कुसुम घावटे हे बिनविरोध निवडून आलेले सदस्य उपस्थित होते.
 
Top