नळदुर्ग :– येथील नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांनी मागासगर्वीय महिला नगरसेविकेस प्रजासत्ताक दिनी जातीवाचक शिवीगाळ करुन अपमानित केल्याप्रकरणी अनुसुचित जाती/जमाती अन्याय प्रतिबंधात्मक कायदयाखाली कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा तथा विदयमान नगरसेविका निर्मलाताई अरविंद गायकवाड यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनी नळदुर्ग नगरपालिकेत ध्वजारोहणाप्रसंगी मी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजनास नसल्याचे निदर्शनास आणून देवून प्रतिमा पूजनासाठी ठेवण्याची विनंती केली. यावेळी ही बाब मुख्याधिकारी यांना सांगून विचारणा केली असता त्यांनी “तुम्हाला फक्त आंबेडकरच दिसतात का, याच्याशिवाय काही सुचते का नाही, तुम्ही शांत रहा” अशाप्रकारे एकेरीवर बोलून माझा अपमान केला. मी मागासवर्गीय महिला, माजी नगराध्यक्षा तथा विदयमान नगरसेविका असून मी शासकीय अधिनियमानुसार ध्वजारोहणाच्या वेळेस फोटो पुजनास मुख्याधिकारी यांना विनंती केली होती. तरीही त्यांनी फोटो पूजनास नकार दिला व नंतर सदर घटनेची सारवा-सारवी करुन नंतर फोटो याची एक प्रत नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.लावण्यात आला. मी झेंडावंदन व न.प. सर्व कार्यक्रम होईलपर्यंत गप्प बसून झेंडावंदन झाल्यानंतर मुख्याधिकारी यांचा दालनात चहापानाचा कार्यक्रम चालू असताना परत मी शांततेने डॉ. आंबेडकरांची प्रतिमा लावली नसल्याबाबत विचारणा केली. पुन्हा मुख्याधिका-यांनी उध्दटपणे “ओ तुम्ही गप्प बसा, नाहीतर बाहेर जा” असे बोलून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व अंगावर मारण्यासाठी ऑफिसमधील खुर्ची घेवून आले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मुख्याधिका-याना मी एक मागासवर्गीय महिला, माजी नगराध्यक्षा आहे व सध्या नगरसेविका आहे हे माहिती आहे. तरीसुध्दा सार्वजनिक शासकीय कार्यालयामध्ये इतर अनेक सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मला अपमानित केलेले आहे. त्यामुळे मुख्याधिका-यावर अनु.जाती/जमाती प्रतिबंधात्मक कायदयाखाली गुन्हा नोंद करुन मला योग्य तो न्याय दयावा, अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेन असा इशारा उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याची एक 


 
Top