नळदुर्ग् -:  रस्त्यावरील अतिक्रमणाच्या नावाखाली जिथे कशाचाही अडथळा नाही, रस्त्यापासुन दुर असलेली घरे न.प. प्रशासनाने जातीय वाद करुन पाडली , त्यामुळे  गोर-गरीब लोकावर मोठा अन्याय  झाले असुन  जोपर्यंत बेघराचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते नळदुर्ग शहरामध्ये ठाण मांडुन बसणार असल्याचे सांगुन याप्रकरणी आपण लवकरच  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन दोषीवर कडक कारवाई करावी व  बेघर केलेल्याना तत्काळ घरे बाधुंन  त्याचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी करणार असल्याचे एम आय एमचे राज्य कोरकमिटी उपाध्यक्ष  अंजुम इनामदार यानी येथे सांगितले       
       नळदुर्ग येथे डिंसेबर महिन्यात अतिक्रमणा हटवा मोहिम राबविण्यात आली, मात्र अतिक्रण काढताना अचानक एक पक्की घरे असलेली वस्ती चक्क पाडुन भुईसपाट करण्यात आली, त्यामुळे शेकडो कुंटूब बेघर झाले. संबधित आधिका-याने कुणाच्या सांगण्यावरुन घरे पाडली याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असलयाचे इनामदार यानी सांगितले. यावेळी संबधितानी भुमाफीयाशी संगणमत करुन मोठी आर्थिक उलाढाल करुन लोकावर अन्याय केल्याचे व इतर सविस्तर माहिती  अनेकानी यावेळी सांगितले.       
       ए आय एम आय एम महाराष्ट्र कोर कमिटी उपाध्यक्ष अंजुम इनामदार यानी खास पुण्याहुन येवुन  नळदुर्ग शहराला भेट दिली , यावेळी त्यानी पडलेल्या घराची पाहणी केली , त्याचबरोबर  बेघर कुटूंबियाची भेट घेवुन विचारपुस केली, त्याच्या समवेत जुबेर मेमन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी   नळदुर्ग कार्याध्यक्ष मन्सूर शेख, बाशीद कुरेशी, गौस रजवी, आदीम कुरेशी, रिपाइचे शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , आदिसह बेघर कुटूब उपस्थित होते.  
 
Top