नळदुर्ग -: येथील बेघर कुटूंबियाचे पुनवर्सन करावे याकरिता जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 मार्च रोजी पुनवर्सन परिषद घेण्यात आली. त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला जाहीर पाठिंबा दिला होता. शासनाने बेघर प्रकरणी 31 मार्च अखेरपर्यंत पुनवर्सनाबाबत पक्का आदेश दिले नाही. त्याच्या निषेधार्थ नळदुर्ग येथील महामार्गावर दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने “रास्ता रोको आंदोलन” करण्याचा इशारा दिला आहे.
         नळदुर्ग शहरात दि. 28,29,30 डिसेंबर या कालावधीत नगरपालिका प्रशासनाने रस्त्याला अडथळा ठरणारे काही अतिक्रण काढले. तर अतिक्रमणाच्या नावाखाली शहरातील गोर गरिबांचे घरे जेसीबीने पाडून अनेक कुटूंबाना बेघर करून हुसकावून लावले. त्यामध्ये अक्कलकोट रोड सर्वे नं. 29 मध्ये पन्नास वर्षापूर्वीपासून वडिलोपर्जित कब्जेवहिवटीनूसार राहणा-या बंजारा (लमाण) समाजाचे मोठया प्रमाणावर घरे पाडून त्यांना हुसकावून लावले. त्यांना कोणतीही नोटीस किंवा सुचना दिली नाही. मुख्याधिकारी यांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता पोलिसांच्या सहकार्याने अत्यंत घिसाड घाईन घरे उध्वस्त केली. त्यामध्ये लमाण, दलित, मुस्लिम समाजाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शहरातील बाजारपेठ उध्वस्त झाल्याने ऐन दुष्काळात व्यापा-यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. बेघर झालेल्या कुटूंबाचे व व्यापा-यांचे तातडीने पुनवर्सन करावे. याबाबत मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी व न.प. मुख्याधिकारी नळदुर्ग यांना दि. 4 मार्च 2016 रोजी लेखी निवेदन देवून मागणी करण्यात आली होती. याबाबत अद्यापपर्यंत काहीच काहीच कारवाई करण्यात आली नाही.
     बेघर कुटूंबाचे पुनवर्सन करण्याबाबत दि. 1 मार्च रोजी नळदुर्ग येथे जेष्ठ समाजवादी विचारवंत  पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली पुनवर्सन परिषद संपन्न झाली. या परिषदेस मनसेने जाहीर पाठिंबा दिले आहे. दि. 31 मार्च पर्यंत शासनाने बेघरांबाबत पक्का आदेश काढून पुनर्वसन करण्याचा ठराव घेण्यात आले होते. व ते शासनास पाठविण्यात आले. मात्र सव्वा महिन्याचा कालावधी उलटत आला तरी शासन स्तरावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्याच्या निषेधार्थ नळदुर्ग शहरातील राष्ट्रीय महामार्गावर दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मनसेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
    याची एक प्रत उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक, तहसलिदार, नळदुर्ग न.प. मुख्याधिकारी, सहाय्यक पालिस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आले आहे.  या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हासचिव अमर कदम, परिवहन उपजिल्हाध्यक्ष बशीर शेख, नळदुर्ग शहराध्यक्ष जोतिबा येडगे, उपाध्यक्ष अरूण जाधव, अलीम शेख, रमेश घोडके, गौस कुरेशी, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, विद्यार्थी सेना अध्यक्ष शिरीष डुकरे, अस्लम शेख, वशीम कुरेशी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.  

 
Top