नळदुर्ग :- येथील हजरत सैय्यदा खैरून्नीसा बेगम साहेब उर्फ सरकार नानिमाँ यांचा उरूस दि. 13 ते 15 मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे.  
     उरूस कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमासह कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे लाभ भाविकांनी घेण्याचे अवाहन उर्स समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सरकार नानिमाँ या हिंदू – मुस्लिम धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. दि. 13 ते 15 मे या कालावधीत उर्ससास प्रारंभ होत आहे. यावर्षीचा हा 41 वा उरूस आहे. 13 मे रोजी दुपारी 2 वाजता रिजवान काझी यांचे निवासस्थान ते नानिमाँ यांचे ऐतिहासिक किल्ल्यातील वास्तव्य असलेल्या निवासस्थानापासून संदल मिरवणूक निघणार आहे. दि. 14 मे रोजी सायंकाळी सहा वाजता कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 15 मे रोजी सकाळी 10 वाजता जियारतचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उर्सनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन रिजवान काझी यांनी उरूस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.  
   दरम्यान मुकबरा नवाब दुल्हेखान मस्जीद व कब्रस्थान, नानिमाँ दर्गाह नळदुर्ग येथील वार्षिक उर्स साजरा होत असून गेल्यावर्षी प्रमाणे उर्स जिल्हा वक्फ अधिकारी उस्मानाबाद यांच्या देखरेखीमध्ये करण्यात यावे. तसेच सदरहू दान पेटीला सिल करून जोपर्यंत व्यवस्थापन समितीचे निर्णय होत नाही तो पर्यंत सदरहू सिल बंद पेट्या उघडू नये. तसेच पेट्या स्थलांतरीत करू नये व सविस्तर अहवाल उर्स संपल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा वक्फ अधिकारी यांना 9 मे रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले आहे. या आदेशाची एक प्रत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, तुळजापूर पोलिस निरीक्षक, नळदुर्ग पोलिसांना देवून जिल्हा वक्फ अधिकारी यांना सहकार्य करण्याचे म्हटले आहे.  
 
Top