नळदुर्ग :- भारतामध्ये चालणा-या अभिनव शिक्षण पध्दतीचा अभ्यास करायला आलेल्या इस्त्राईलच्या ऍथिल हॅरेरी यांनी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालणा-या पालावरच्या शाळेस भेट दिली.
     नळदुर्ग येथील महामार्ग पोलीस ठाण्याजवळ बुडगाजंगम, मरिआईवाले, वडार, वैदू समाजाची वस्ती मागील दहा वर्षापासून वास्तव्यास आहे. पालावरची शाळा या उपक्रमातून शिक्षणाच्या सरकारासोबतच आरोग्य, बचतगट, स्वावलंबन, संघटन असे विषय ही मागील तीन वर्षावासून होत आहेत.
वंचित, दुर्लक्षित अशा समाजासाठी चालणा-या या अभिनव प्रयोगाचा अभ्यास करायला इस्त्राईल येथील ऍथिल हॅरेरी या आल्या होत्या. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. यांचे राहणीमान, उदरनिर्वाहाची साधने, पालावरच्या शाळेनी या बहुभाषिक समाजासाठी विकसित केलेली शिक्षण पध्दती, आरोग्य पेटी, शैक्षणिक साहित्य इत्यादीची पाहणी केली. त्यावेळी त्यांचे भारतीय पध्दतीने औक्षण करुन व परिसरातील वनस्पतीपासुन तयार केलेल्या पुष्पहाराने स्वागत केल्यानंतर त्या भारावुन गेल्या होत्या. दूभाषी म्हणून ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे पदाधिकारी अभिजीत कापरे, सेवावृत्ती सुहास फाटक यांनी काम केले.
दुबई येथील अनिवासी भारतीय ऐश्वर्या जोशी यांनी वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य पाठवले होते. त्याचे वितरणही यावेळी करण्यात आले. यावेळी चारही समाजातील वस्ती प्रमुख, हराळी येथील ज्ञानप्रबोधिनीचे पदाधिकारी अभिजित कापरे, सेवावृत्ती सुहास पाठक, पालावरच्या शाळेचे प्रमुख उमाकांत मिटकर, गटप्रमुख मिरा मोटे, आरोग्यप्रमुख कविता माघे, शिक्षिका वर्षा सोमवंशी, आरोग्य मित्र सुरेखा बनछेरे, दत्ता मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्याच्या 11 जिल्हयात 35 समाजामध्ये 43 पालावरचे संस्कार केंद्र चालतात. शिक्षणाशिवाय वस्तीचा सर्वांगिण विकास करुन या समाजबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न संघटना करत आहे.
-    उमाकांत मिटकर, प्रांत कार्यकारिणी सदस्य, भटके विमुक्त विकास परिषद
 
Top