तुळजापूर तालुक्यात 65 पैकी 9 तलाव भरले

नळदुर्ग  -  तुळजापूर, अणदूर व नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणा-या नळदुर्ग येथील कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पामध्ये आजअखेर 7.303 दशलक्ष घनमीटर (22.62 टक्के) एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील 65 तलावापैकी केवळ 9 तलाव शंभर टक्के भरले असून 26 तलाव अदयाप कोरडेठक आहेत. तसेच 27 तलावातील पाण्याच्या पातळीत अल्पशी वाढ झाली आहे. तर 4 तलावात सरासरी 50 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. सर्वत्र पावसाने मोठा कहर केला असून याउलट तुळजापूर तालुक्यात परिस्थिती आहे. आणखीन मोठया पावसाची गरज आहे.
तुळजापूर तालुक्यात गेल्या पाच वर्षापूर्वी म्हणजे सन 2010 मध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यावेळी 1 हजार 25 मि.मी. एवढे विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे सर्वश्रूत आहे. त्यानंतर पर्जन्यमान कमी कमी होत गेले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना या भागातील जनतेला करावा लागला. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळा सुरु होवून सव्वा दोन महिने उलटत आले तरीही बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस असले तरी मोठे पाऊस झाले तरच विविध भागातील तलाव भरण्याची शक्यता आहे.
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ, आलियाबाद, होर्टी लघु प्रकल्प, होर्टी क्रं. 1 साठवण तलाव, होर्टी क्रं. 2 साठवण तलाव, मुर्टा क्रं. 2 साठवण तलाव, जळकोट साठवण तलाव, सलगरा मडडी, सिंदगाव साठवण तलाव असे एकूण नऊ तलाव शंभर टक्के भरले आहेत. तर हरणी मध्यम प्रकल्प, भारती लघु पाझर, पिंपळा ल.पा., सांगवी काटी ल.पा., काटी दहीवडी ल.पा., दिंडेगाव ल.पा., मंगरुळ ल.पा., कसई नांदुरी ल.पा., गंजेवाडी ल.पा., काळेगाव साठवण तलाव, सावरगाव साठवण तलाव, केमवाडी साठवण तलाव, आपसिंगा साठवण तलाव, आरबळी साठवण तलाव, देवकुरळी साठवण तलाव, कदमवाडी साठवण तलाव, ढेकरी साठवण तलाव, तडवळा साठवण तलाव, डोंगरी साठवण तलाव, चिवरी उमरगा, चिकुंद्रा, फुलवाडी, केशेगाव, देवसिंगा तुळ, वडगाव, वाणेगाव असे एकूण 26 तलावे जोत्याच्या पातळीखाली (कोरडे) आहेत.
त्याचबरोबर हंगरगा लघु पाझर तलावात 1.996 दशलक्ष घनमीटर (54.34 टक्के), अणदूर साठवण तलाव 0.998 दलघमी (85.68 टक्के), येडोळा तलाव 0.800 दलघमी (69.18 टक्के), पळस निलेगाव ल.पा. या चार तलावात पन्नास टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आजअखेर उपलब्ध आहे. तर कुरनूर मध्यम प्रकल्प (बोरी धरण) मध्ये 6.5 दलघमी (20 टक्के), खंडाळा मध्यम प्रकल्प 2.547 दलघमी (48.56 टक्के), यमाई लघु पाझर तलावात 0.138 दलघमी (8.82 टक्के), हंगरगा नळ ल.पा. 0.311 दलघमी (13.63 टक्के), कामठा ल.पा. 0.039 दलघमी (3.09 टक्के), इटकळ ल.पा. 0.105 दलघमी (9.78 टक्के), आरळी ल.पा. 0.136 दलघमी (16.89 टक्के), मसला ल.पा. 0.045 दलघमी (3.29 टक्के), सांगवी माळुंब्रा ल.पा. 0.179 दलघमी (5.62 टक्के), बचाई ल.पा. 0.253 दलघमी (22.81 टक्के), तामलवाडी साठवण तलाव 0.569 दलघमी (33.61 टक्के), सिंदफळ साठवण तलाव 0.245 दलघमी (14.55 टक्के), धोत्री साठवण तलाव 0.332 दलघमी (25.37 टक्के), हंगरगा तुळ साठवण तलाव 0.154 दलघमी (10 टक्के), खंडाळा साठवण तलाव 0.042 दलघमी (3.35 टक्के), वडगाव लाख साठवण तलाव 0.112 दलघमी (9.71 टक्के), कुंभारी साठवण तलाव 0.076 दलघमी (3.58 टक्के), रामदरा ल.पा. 2.202 दलघमी (8.58 टक्के), कुन्सावळी 0.409 दलघमी (38.54 टक्के), चिवरी उमरगा क्रं. 1 मध्ये 0.108 दलघमी (7.58 टक्के), मुर्टा क्रं. 1 साठवण तलाव 0.754 दलघमी (47.18 टक्के), किलज साठवण तलाव 0.544 दलघमी (44.19 टक्के), सलगरा (दि) साठवण तलाव 0.399 दलघमी (25.72 टक्के), लोहगाव साठवण तलाव 0.390 दलघमी (32.39 टक्के), नंदगाव साठवण तलाव 0.515 दलघमी (38.46 टक्के), खुदावाडी साठवण तलाव 0.145 दलघमी (11.29 टक्के) या 27 तलावात अल्पसा पाणीसाठा आहे.
 
Top