“आखिर क्यु” या हिंदी लघुपटाचे लाँचिंग

मुंबई :- आतंकवादाचा नायनाट करण्याचा संदेश देणा-या “आखिर क्यु” या हिंदी लघुपटाचे शुभारंभ साकीनाका येथील पेनन्सुला ग्रॅड या पंचतारांकित हॉटेलमध्ये कडतोबा मुव्हीजने नुकतेच केले आहे.
यावेळी कंपनीचे सल्लागार प्रितम आठवले यांच्या हस्ते नारळ वाढवून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सदर लघुपटाचा हेतू व तदनुशंगीक बाबत स्पष्ट करणारी विवेचने व वार्ताहारांच्या प्रश्नांची उत्तरे लघुपटाचे निर्माते के. रवी, दिग्दर्शक मंजूर अहमद, कथा व संवाद लेखक अतुल चोबे, संगीतकार अमित मिश्रा, लघुपटाचे नायक राहुल रवी, नायिका नवमित यांनी कथन केली.
सदर लघुपटाची कथा ही भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीर मधील अस्थिरतेवर प्रकाश टाकून त्याची पार्श्वभूमी व त्यावरील संभाव्य उपाययोजना या भोवती फिरते. भारत पाकिस्तानच्या फाळणीच्यावेळी झेललेल्या संकटावर मात करुन आपआपल्या देशावर प्रेम करणा-या त्यावेळच्या पिढीची मनस्थिती, अगतिकता व आजच्या स्थितीतU दिशाभुल झालेले निवडक तरुण व तरुणी यांच्या वैचारिक संघर्षाचा वेध घेत आपआपल्या देशावर निष्ठा प्रेम वृध्दीगंत करण्याची शिकवण सदर चित्रपट देवून जाईल, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.
चित्रपटांचे संपूर्ण चित्रीकरण येत्या महिन्यात पूर्ण करुन विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर सदर चित्रपट रसिकांच्या समोर येईल, अशी खात्री निर्माते के. रवी यांनी दिली.
 
Top