नळदुर्ग (प्रतिनिधी) :- मराठवाडयाचे प्रती साने गुरुजी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांना लातुर येथील काळे प्रतिष्ठानच्यावतीने सन 2015-16 चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी लातुर येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळयास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, आ. त्रिंबक भिसे, आ. सतीश चव्हाण, माजी आमदार बाबासाहेब पाटील, लातूर जि.प. चे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुरस्काराबददल सि.ना. आलुरे गुरुजी यांचे सर्वत्र अभिनंदन करुन शुभेच्छा दिले आहे.
 
Top