तुळजापूर : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर यांनी आपल्‍या जिल्‍हा सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. सध्‍या नगरपालिकेच्‍या निवडूण चालू असून ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर त्‍यांनी राजीनामा दिल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात मनसेला मोठा धक्‍का बसला आहे.  परमेश्‍वर हे दुस-या पक्षात प्रवेश करतील का? आता परमेश्‍वर हे कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 1990 पासून अमरराजे परमेश्‍वर हे मनसेचे काम करत आहेत. सन 2006 ते 2013 या कालावधीत परमेश्‍वर हे मनसेचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष होते. सध्‍या उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नगरपालिका निवडणूक लागल्‍या आहेत. मनसेने सुध्‍दा काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र बरेच ठिकाणी पक्षातील निष्‍ठावंत कार्यकर्त्‍यांना संधी न देता मर्जीतील व दुस-या पक्षातील कार्यकर्त्‍यांना संधी देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे अमरराजे परमेश्‍वर हे नाराज असल्‍यामुळे त्‍यांनी राजीनामा दिल्‍याचे बोलले जात आहे.
गेल्‍या अनेक वर्षापासून उस्‍मानाबाद जिल्‍ह्रयातील मनसेतील काही ठराविक पदाधिकारी मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांची दिशाभूल करुन पक्ष सं‍पविण्‍यात प्रयत्‍न करीत आहेत. जो पर्यंत अशी मंडळी पक्षात ढवळाढवळी करण्‍याचे काम करीत आहेत तो पर्यंत मी पक्षाचे काम करु शकत नाही. निवडणूक लढवायचीच नसेल तर पक्षाचे कार्य करण्यात काय अर्थ ? तसेच निष्‍ठेने काम करणा-या मनसैनिकांना उमेदवारी न देता परक्‍यांना उमेदवारी देणे कितपर्यंत उचित आहे, या कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्‍याचे अमरराजे परमेश्‍वर यांनी सांगितले.
 
Top