नळदुर्ग  (प्रतिनिधी) : येथे  आंबाबाई मंदिरातील सभागृहात अक्षरवेल महिला साहित्य मंडळ , नवदुर्गा साहित्य मंडळ, संस्कृती महिला मंडळ, भोईराज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खास महिलाकरिता विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा व-हाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जळकोट येथील अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती कस्तुरा कारभारी, नगरसेविका सौ. अंबुबाई दासकर, माजी नगरसेविका सौ. सुप्रिया पुराणिक, सौ. सुमन जाधव, डाॅ.सौ. सुजाता सुरगुडे, अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख सौ. लता नाईक आदीजण उपस्थित होत्या.

सांस्कृतिक कार्यक्रमात समाज प्रबोधनात्मक गीत, जलसाक्षरता, बेटी  बचाओ, महिलांचे आरोग्य या विषयावर गीत व नाट्य सादरीकरण करण्यात आले. त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलासाठी हक्काचे व्यासपीठ अक्षरवेल मार्फत मिळाले आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बॕकेच्या व्यस्थापिका कल्पना सबनीस,डाॕ. सुजाता धुरगुडे ,प्रा.जयश्री घोडके,प्रा.स्मिता पुदाले,कविञी आशा शेख,सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद ,संगीता गायकवाड, कल्पना गायकवाड यासह नळदुर्ग  शहरातील सर्व महिला बचत गटाच्या पदाधिकारी ,सदस्या  आसे मिळुन जवळपास दोनशे महिला  सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पुदाले व माधुरी घोडके यांनी केले तर सौ. राधिका मिटकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवदुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना काळे, शोभा शिंदे, अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या सचिव सौ. मिलन कासार, भोईराज मडळाच्या गीता पुदाले मार्गदर्शिका अनुराधा जेवळीकर आदींनी पुढाकार घेतले
 
Top