बार्शी -: वैराग तालुका निर्मितीसाठी तसेच पिण्यासाठी व शेतीसाठी उजनीचे पाणी मिळावे, यासाठी शिवसेनेच्यावतीने विशेष प्रयत्न केला जाईल, असे मत शिवसेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगेपाटील यांनी व्यक्त केले.
रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहातील बुथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघात प्रत्यक्ष भेटी देऊन बुथप्रमुखांना मार्गदर्शन करीत आहेत. उस्मानाबाद मतदार संघातील बुथप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात येत असल्याने त्याच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यास व पदाधिका-यांना मार्गदर्शन, बुथप्रमुखांची यंत्रणा सक्षमीकरण करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगेपाटील यांनी बार्शी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व बुथप्रमुखांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली.
यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, बाबासाहेब कापसे, तालुकाप्रमुख काका गायकवाड, शहरप्रमुख दिपक आंधळकर, महिला आघाडी प्रमुख मंगलताई पाटील, वैराग शहरप्रमुख संतोष गणेचारी, उपतालुकाप्रमुख शिवाजी सुरवसे, युवा जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, विजय माने, प्रमोद सोनवणे, प्रुफुल्ल पाटील, बाळासाहेब पवार, डॉ. लाडे, अमोल जाधव, राजकुमार पाटील, धनंजय वाणी, सुशांत गायकवाड, गगन दास, गणेश धुमाळ, यांच्यासह बार्शी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक प्रभाग आणि वॉर्डमध्ये शिवसेना शाखेचे फलक, काम करणा-या बुथप्रमुखांची सविस्तर यादी, मतदार यादीतील तसेच त्याच भागातील बुथप्रमुख असावा, प्रत्येक गावासाठी महिला आघाडी, संपूर्ण मतदारसंघाच्या विभागवार प्रमुखांवर कामाच्या जबाबदारीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या पदाधिका-यांकडून पक्षाचे काम नीटपणे केले जात नाही अथवा वेळोवेळी कुचकामी ठरले असतील, त्यांची हकालपटटी केली जाईल, असेही त्यांनी बजावले.