नळदुर्ग -: दुर्जर आजारावरील रुग्णांच्या सेवेसाठी शासन आर्थीक मदतीसाठी सर्वोतरी प्रयत्न करत असून जानकी रुग्णालयानेही ग्रामीण भागातील रुग्णांना किफायशीर दरात सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली.
अणदूर (ता. तुळजापूर)येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन संचलित जानकी रुग्णालयाच्या 6 व्या वर्धापन दिन व श्रीमती इंदू विरेंद्र गुप्ता ट्रॉमा केअर सेंटरचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पालकमंत्री ना. चव्हाण बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष व्हट्टे, ब्रिच कॅन्डी हॉस्पिटल,मुंबईचे शल्य चिकित्सक डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ.विनायक जोग, यमाजी मालकर, माजी आमदार सि.ना.आलुरे गुरुजी, जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, सुधाकर अहंकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री ना. चव्हाण म्हणाले की, जानकी रुग्णालयाच्या डॉ.शुभांगी अहंकारी यांनी कॅन्सर सारख्या दुर्जर रोगावर मात करुन यशस्वी झाल्या आहेत. त्यांचा आदर्श कौतुकास्पद आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केलेले डॉ.देशपांडे व डॉ.जोग हे या ठिकाणी आहेत. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, असे भावूक उदगार ना.चव्हाण काढले. अणदूर येथे सी.एम.बी.सी.,मुंबईच्या श्रीमती नंदिनी गुप्ता यांच्या देणगीतून प्रयत्नातून जानकी रुग्णालयात हे अद्यावत ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी होत आहे. याचा फायदा या भागातील अपघातग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी होणार आहे. भविष्यात त्यांनी चांगल्या सुविधा रुग्णांना दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्याच्या बाबतील धोरण बाजूला ठेवून शासन प्रयत्न करत आहे. तसेच आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यासाठी स्वंयसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा,असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की, आरोग्य सेवेच्या माध्यमातून महिलांना संघटीत करण्याचे महान कार्य जानकी रुग्णालयातून होत असल्याबद्दल त्यांचे कौतूक करुन कॅन्सर सारख्या आजारातून त्या मानसिकदृष्या डॉ. शुभांगी अहंकारी सावरुन त्यांनी कामास सुरुवात केली आहे. त्यांच्या भावी कार्यास मी सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.निसर्गाने वातावरणात मोठया प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे कॅन्सर सारख्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी स्वत:चे आरोग्य स्वत: जपण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न केला तर तो प्रभावी ठरु शकतो. पर्यावरण निर्मूलनासाठी प्लॉस्टीक पिशवी व पर्यावरण दुषित गाव मुक्त करण्यासाठी संकल्पना राबविण्याच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
डॉ.व्हट्टे म्हणाले की, नैपूण्य सर्वांकडे आहे त्यासाठी संवदेनाची जोड लागते.आरोग्याच्या जागृतीसाठी प्रबोधनाची गरज आहे. सामाजिक बांधिलकेच्या जाणीवेतून उभाण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे, ही चांगली बाब आहे. या कामासाठी सर्वांनी मदत करावी,अ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी यमाजी मालकर, डॉ.देशपांडे, माजी आमदार सि.ना.आलुरे गुरुजी, डॉ.शुभांगी अहंकारी व डॉ.अशोक अहंकारी यांची भाषणे झाली. डॉ.शशीकांत अहंकारी यांनी प्रस्ताविक करुन हॅलो फाऊंडेशन राबवित असलेल्या विविध आरोग्य सेवांची माहिती दिली.
यावेळी डॉक्टर, आरोग्यसेविका,बचतगटातील महिला यांच्यासह विविध अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.क्रांती रायमाने यांनी केले तर आभार डॉ.अशोक अहंकारी यांनी मानले.