उस्मानाबाद :- जिल्ह्यात क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धा सिव्हील क्लब, उस्मानाबाद येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील स्पर्धेचा अंतिम निकाल घेाषित करण्यात आला असून विजयी खेळाडु व संघाची लातूर येथे होणाऱ्या विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली.
या स्पर्धा दि. 12 व 13 ऑगस्ट या कालावधीत श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे खेळवल्या गेल्या. राजाभाऊ शेरखाने यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हा लॉनटेनिकस संघटनेचे अध्यक्ष युवराज नळे, क्रीडा अधिकारी डी.व्ही. गडपल्लेवार व डी.कके. नाईकवाडी यांच्यासह जावेद तांबोळी, उमेश निंबाळकर आदिंची उपस्थिती होती.
14 वर्षाखालील मुलांच्या लॅानटेनिस स्पर्धेत यशस्वी खेळाडू व शाळेतील संघ पुढीलप्रमाणे आहेत.जकाते शुभंकर, नळे विक्रांत, वाघमारे अनिकेत, गोरे वात्सल्य, रत्नपारखी केदार तर या वयोगटात मुलीच्या स्पर्धेत प्रेरणा देशमुख हीने विजेतेपद मिळविले.
17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत-उपासे़ सुमीत, पाटील़ भालचंद्र, जकाते शुभम जेटीमोर सुरेंद्र, जेटीथोर सुरज तर मुलींच्या स्पर्धेत यशश्री ओव्हळ यांनी विजेतेपद मिळविले तर 19 वयोगट वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत अनंत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.