मुंबई -: शहराच्या सुरक्षेकरिता व्यापक जनजागृतीसाठी मुंबई पोलीसांनी सुरु केलेल्या 'मुंबई के लिए एक मिनट' या उपक्रमातून मुंबईकरांनी फक्त एक मिनिट वेळ सुरक्षेसाठी दिल्यास पोलीसांच्या साथीला कोट्यवधी लोक उभे राहतील, असा विश्वास गृहमंत्री श्री.आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई पोलीसांनी आयसीआयसीआय बॅंकेच्या सहकार्याने सुरु केलेल्या 'मुंबई के लिए एक मिनट' या जागृतीपर उपक्रमाचा शुभारंभ आज, गृहमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंग, आयसीआयसीआय बॅंकेचे कार्यकारी संचालक श्री. रामकुमार, सह पोलीस आयुक्त हिमांशू रॉय, सदानंद दाते आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
'मुंबई के लिए एक मिनट' उपक्रमातंर्गत सुरक्षेचे महत्त्व विशद करणा-या व्हिडीओ जाहिरातींचे प्रकाशन यावेळी गृहमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, प्रयत्नांची शिकस्त करुन पोलीस जनतेच्या जीवित-मालमत्तेचे रक्षण करताहेत, अशा स्थितीत मुंबईकरांनी फक्त एक मिनिट वेळ काढून आपल्या सभोवतालच्या संशयित घटनांची, वस्तूंची माहिती तात्काळ पोलीसांना दिल्यास पोलीसांच्या साथीला कोट्यवधी लोक उभे राहतील. सुरक्षेची जबाबदारी पोलीसांचीच आहे, मात्र जनतेचे सहकार्य मिळाले तर ही जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
मोहिमेतील लोकजागृतीच्या जाहिराती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद सरकार करेल,असे स्पष्ट करुन आयसीआयसीआय बॅंकेने या उपक्रमासाठी सव्वा कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याबद्दल गृहमंत्री श्री. पाटील यांनी बॅंकेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतूक केले. सुरक्षित राहण्यासाठी जनतेने जर एक मिनिट वेळ दिला तर आपण सुरक्षित राहूच पण आपली मुंबईही सुरक्षित राहिल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंग यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी केले.