![]() |
प्रतिकात्मक |
उस्मानाबाद -: दोघा तोतया पोलिसांना एका वृद्धेचे 22 ग्रॅम सोने लंपास केले. ही घटना प्रकार गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील माणिक चौक, बार्शी बायपास मार्गावर घडली.
शारदा सुरेश भावसार (वय 55 वर्षे) या आपल्या माणिकनगर येथील घरासमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास उभारल्या होत्या. यावेळी दोघे इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी सई रोकडे येथेच राहतात का? त्यांच्यावर चाकूहल्ला झाला आहे, आम्ही पोलिस आहोत, चौकशीसाठी आलो आहोत असे सांगितले. तसेच अंगावर सोन्याचे दागिने घालू नका, अशा पोलिसांच्या सूचना आहेत. तुम्ही कशाला दागिने घालून फिरता, असे म्हणून अंगावरील दागिने काढून पुडीत बांधून ठेवण्यास सांगितले. यामुळे घाबरलेल्या महिलेने आपल्या अंगावरील 22 ग्रॅमचे सोन्याचे दागिने काढले असता सदरील दोघांनी हातोहात हे दागिने लंपास करून यामाह दुचाकीवरून पसार झाले. घडला प्रकार लक्षात येईपर्यंत दोघेही बेपत्ता झाले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश खारगे करत आहेत.