बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार निटपणे होत नसल्याने आपण तक्रार दिली आहे. आमदार असतांना मला काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला, नागरिकांना उद्योग व्यवसायासाठी मदत करत आहे, बदलत्या दिवसानुसार शेतकर्‍यांनी व्यापार उद्योगाची कास धरावी असे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.
    रविवारी दि.१६ फेब्रुवारी रोजी कोरफळे (ता. बार्शी) येथील रस्ते व पाणीपुरवठा विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अॅड्.सुभाष जाधवर, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगरसेवक अशोक सावळे, अशोक बोकेफोडे, अॅड्.अनिल पाटील, सुधीर बारबोले, हनुमंत धस, बाबासाहेब मोरे, काका फुरडे, विनोद काटे, शिवाजी डिसले, पंचायत समिती सभापती कौसल्या माळी, किसन काळे, अंकुश मोरे आदी उपस्थित होते.
 
Top