बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- चाकूचा धाक दाखवून चार पाच वेळा बलात्कार व जातीवाचक अपशब्द वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आरोपी सह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत २३ वर्षाच्या पिडीत महिलेने बार्शी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. गोरक्षण उर्फ भैय्या रामदास राऊत असे गुन्ह्यात आरोप झालेल्याचे नाव आहे.
    बार्शी पोलिसांत ३७६, ४५२, अनु.जाती जमाती क. ३(१) (१२) व ३ (२) (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधिक्षक रोहिदास पवार हे करीत आहेत.
 
Top