उस्मानाबाद :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 67 व्या वर्धापन दिन आज जिल्हृयात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. 
प्रारंभी सकाळी 8 वाजून 45 मिनीटांनी डॉ. नारनवरे व मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाने तीन फैरी झाडून मानवंदना दिली. डॉ.नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली.                           
जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,  अधिकारी, पत्रकार  व नागरीकांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. 
          या कार्यक्रमाला आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, विविध मान्यवर, जिल्हा पोलीस अधीक्षक  अभिषेक  त्रिमुखे,  जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. एन. उबाळे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अपर पोलीस अधीक्षक     डॉ. दीपाली घाडगे-धाटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे, उपविभागीय अधिकारी श्री. चव्हाण, उपजिल्हाधिकारी सर्वश्री प्रभोदय मुळे, श्रीरंग तांबे, पांडूरंग कुलकर्णी, अभिमन्यू बोधवड,शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका भगत-नारनवरे, तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव, अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत पडवळ यांनी केले.  
 
Top